अन् चक्क मंत्री गिरीश महाजन यांनी चालवला ट्रक

अन् चक्क मंत्री गिरीश महाजन यांनी चालवला ट्रक

जळगाव: दारूच्या नशेत चालक आपला ट्रक रस्त्यातच सोडून झोपून गेला. त्यामुळे ट्रक हायवेवर असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. याच मार्गावरून जात असलेले महाराष्ट्राचे जल संपदा मंत्री गिरीश महाजन यांना चक्क गाडीतून उतरुन रस्त्याच्या मधोमध उभा असलेला ट्रक चालवीत बाजूला लावला.  

हायवेवर वाहतूक व्यवस्था ठप्प झालेली पाहून तसेच रहदारी वाढत असलेली पाहून गिरीश महाजन हे स्वतः गाडीतून उतरले आणि रस्त्याच्या मधोमध उभा असलेला 14 चाकी ट्रक चालवीत बाजूला लावला. यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली. हा सर्व प्रकार काही क्षणातच सोशल मीडियावर वायरल झाला. यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ट्रक चालवीत आहे. तर महामार्गावर गाड्याच्या रंगाचं- रांगा लागल्या आहेत . हा प्रकार पोलिसांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी ट्रक चालकाला अटक केली.

 

COMMENTS