सामान्यांपासून ते व्हीव्हीआयपीपर्यंत सगळ्यांच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पण चक्क मंत्री वाहतूक सुरळित करण्यासाठी रस्त्यावर उतरले तर… होय उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये असे वेगळेच चित्र पाहायला मिळाले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक वाहतूक सुरळित करण्यासाठी रस्त्यावर उतरले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
राजभवनाच्या कुंपणाजवळ असलेले एक वृक्ष बुधवारी दुपारच्या सुमारास वाऱ्यामुळे मुख्य रस्त्यावर उन्मळून पडले. राजभवनाबाहेर त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. राज्यपाल नाईक हे पाहून स्वत: रस्त्यावर उतरत वाहतूक पोलिसांना सूचना देत वाहतूक सुरळित करू लागले. सामान्य नागरिकांच्या आश्चर्याला हे दृष्य पाहून पारावार उरला नव्हता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे राजभवनाच्या सीमेवरील एक जुने झाड रस्त्यावर उन्मळून पडले होते. हजरतगंज ते बंदरियाबाग रस्त्यावर त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. राज्यपाल नाईक हे पाहून राजभवनाबाहेर आले आणि त्यांनी वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना वाहतूक वेगळ्या मार्गाने वळवण्यास सांगून रस्त्यात पडलेले वृक्ष त्वरीत हटवण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर सुमारे तासभरात रस्त्यावर पडलेले हे वृक्ष हटवण्यात आल्यानंतर येथील वाहतूक सुरळित झाली. राज्यपालांच्या या तत्परतेची लोकांमध्ये मोठी चर्चा होत आहे.
COMMENTS