औरंगाबाद – अनेकदा पैशांची उधळपट्टी केल्यावर आपण बोलते, पैसे काय झाडाला लागले आहेत का ? मात्र औरंगाबादमध्ये ही म्हण खरी ठरली आहे असचं म्हणावे लागेल…. औरंगाबादच्या एन- 2 परिसरात एका झाडाला चक्क खऱ्या नोटा लटकल्या आहे. मात्र त्या नोटा कुणीच काढायला गेले नाही. कारण या सर्व नोटा चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 च्या नोटा होत्या. आज सकाळी 11 च्या सुमारास एका अज्ञाताने आपल्याकडील या बाद झालेल्या नोटांचे बंडल्स मैदानामधल्या झाडांवर फेकून दिल्या. त्यातल्या काही नोटा झाडांवरच लटकत होत्या. झाडाला लटकलेल्या नोटा पाहण्यासाठी मात्र परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
सिडको एन – 2 परिसरातील एका झाडाला लटकत असल्याचे वृत्त एएनआयने प्रसिद्ध केले. चलनातून बाद झालेल्या असल्याने त्या कुणीही उचलल्या नाहीत. कुणा अज्ञात इसमाने हा दडवून ठेवलेला काळा पैसा वैतागून येथे टाकल्याचे सांगितले जात असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, फेकण्यात आलेली रक्कम साडे दहा लाखाच्या आसपास असल्याची माहिती मिळते. पोलिसांकडून या सर्व नोटा ताब्यात घेण्यात आल्या असून नोटा फेकणाऱ्यांचा शोध सुरु आहे.
COMMENTS