सूरतमध्ये एका डेअरी प्रकल्पाची पाहणी करुन पंतप्रधान मोदी पुढच्या कार्यक्रमासाठी जात असताना. त्याचवेळी नॅन्सी नावाची चार वर्षांची चिमुकली मोदींच्या सुरक्षा ताफ्याच्या जवळ जाऊन त्यांना भेटण्याचा आग्रह धरु लागली… आणि या चिमुरडीच्या आग्रहाखातर पंतप्रधानांचा ताफा थांबला. सूरतमधील कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर मोदी यांनी स्वतः गाडी थांबवायला लावली आणि त्या चिमुरड्या मुलीला जवळ बोलावून तिच्याशी काही वेळ गप्पा मारल्या. या प्रकारामुळे सर्वजणच भारावून गेले.
सूरतमधील एका हिऱ्याच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगाराची ही मुलगी आहे. मुलीचा भेटण्याचा आग्रह चक्क देशाच्या पंतप्रधानांनी पूर्ण केल्याने तिचे कुटुंबीयही सुखावले आहे.
COMMENTS