निवडणूक प्रचाराच्या रिंगणात अभिनेता रितेश देशमुख

निवडणूक प्रचाराच्या रिंगणात अभिनेता रितेश देशमुख

लातूर – लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारासाठी लातूरमध्ये बॉलिवूड अभिनेता आणि जिल्ह्याचा सुपूत्र रितेश देशमुखचा रोड शो आयोजित करण्यात आला होता.

लातूर शहरातील तरुणाईने रोड शोसाठी मोठी गर्दी केली होती. लातूर शहरातील विविध भागातून ही रॅली काढण्यात आली. शहरातील अनेक उमेदवार आणि रितेश देशमुख यांचे बंधू आमदार अमित देशमुखही यावेळी हजर होते. राजकारण मला कळत नाही, मात्र काँग्रेस शिवाय पर्याय नाही, असे मत रितेश देशमुखने रोड शोवेळी व्यक्त केले.

लातूर महापालिकेतील सत्ता राखण्यासाठी काँग्रेसने कंबर कसल्यामुळे आपला गड राखण्याचे आव्हान अमित देशमुख यांच्यावर असणार आहे. दहा महापालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या तीन महापालिकांसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 21 एप्रिलला मतमोजणी होईल.

 

COMMENTS