मुंबई: साधरणता राजकारणी सुटा-बुटात आणि गाड्यांच्या ताफ्यात दिसतात. मात्र राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा मंत्री रेल्वेच्या फलाटावर बसून, काम करताना तुम्ही पाहिलाय? नाही ना, तर याची प्रचिती मुंबईतही पाहायला मिळाली.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील काल मुंबईहून कोल्हापूरकडे निघाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर एक अधिकारी काम घेऊन आला. एका महत्त्वाच्या कागदपत्रावर चंद्रकांत पाटलांची सही हवी होती. मात्र रेल्वे प्लॅटफॉर्मवर सही कशी घ्यायची असा संभ्रम अधिकाऱ्याच्या मनात होता. पण मोकळ्या ढाकळ्या चंद्रकांत पाटीलांनी कोणताही बडेजाव न करता, प्लॅटफॉर्मवर पडलेल्या गाठोड्यावर बसून, सर्व पेपर वाचून काढले. त्यानंतर चंद्रकांत पाटीलांनी तिथेच सह्या केल्या आणि ते कोल्हापूरसाठी रवाना झाले. यावेळी आजूबाजूला अन्य प्रवासीही होते. शिवाय चंद्रकांत पाटीलांचे सुरक्षा रक्षक आणि स्वीय सहाय्यकही होते. चंद्रकांत पाटीलांचा हा साधेपणा पाहून सर्वच जण अवाक् झाले.
COMMENTS