अपघातामध्ये थोडक्यात बचावले सरसंघचालक मोहन भागवत

अपघातामध्ये थोडक्यात बचावले सरसंघचालक मोहन भागवत

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत शुक्रवारी एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.मोहन भागवत यांच्या गाड्यांचा ताफा यमुना महामार्गावरून जात असताना ताफ्यातील गाड्यांची एकमेकांत धडक झाल्याने हा अपघात झाला.
मथुरामधील सुरीर परिसरातून जात असताना मोहन भागवत यांच्या ताफ्यातील एका गाडीचा टायर फुटला. त्यानंतर त्या गाडीचे नियंत्रण सुटले आणि त्यामुळे इतर गाड्यांची देखील एकमेकांत धडक झाली. या अपघातात संघप्रमुख भागवत यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुरक्षित आहेत. अपघातानंतर ते दुसऱ्या गाडीने पुढे रवाना झाले.

COMMENTS