बातमीचे शिर्षक वाचून अनेकांना धक्का बसला असेल. पण, लगेचच शिर्षकावर जाऊ नका. शिर्षक योग्यच आहे पण,पूर्ण सत्य नाही. कारण, रितेशला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आणि पोलिस गाडीतून घेऊन जात असल्याचा फोटोही सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. पण, वास्तवात रितेशला अटक झालेली नाही. या व्हायरल फोटोमागचे सत्य वेगळेच आहे.
रितेशने कोणताही गुन्हा केला नाही. आणि त्याला त्यासाठी अटकही झाली नाही. हा फोटो आहे तो त्याच्या एका आगामी चित्रपटातला. फोटोत दिसणारी रितेशला झालेली अटक ही वास्तवातली नाही. चित्रपटातील रितेशला अटक होते असे एक दृश्य आहे. या दृश्याचेच हे एक छायाचित्र आहे. व्हायरल झालेल्या फोटोतील प्रसंग असलेला ‘बॅंक चोर’ नावाचा रितेशचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच रितेशच्या ‘बॅंक चोर’चे पोस्टरही रिलीज करण्यात आले होते. तसेच, सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशनही सुरू आहे.
दरम्यान, या चित्रपटात रितेश देवावर विश्वास असलेल्या एका मराठी तरुणाची भूमिका साकारत आहे. यात रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय, रिया चक्रवर्ती आदी मंडळी या चित्रपटात प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मीत यशराज फिल्म्सने केली आहे. बँकेचे कर्ज न फेडू शकल्याने मित्रांच्या मदतीने बँक लुटण्याची योजना तो बनवतो आणि मग पूढचे सगळे रामायण घडते, असे या चित्रपटाचे कथानक आहे. विनोद आणि हलकीफुलकी कथा असलेला हा चित्रपट येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
COMMENTS