निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळणे नेत्यांना बंधनकारक असावे – सरन्यायाधीश

निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळणे नेत्यांना बंधनकारक असावे – सरन्यायाधीश

राजकीय नेत्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा सत्तेवर आल्यावर सोयीस्करपणे त्यांना विसर पडतो. त्यामुळे सत्तेवर आल्यानंतर त्यांच्यावर ही आश्वासने पाळण्याचे बंधनकारक करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी व्यक्त केले आहे.

इकॉनॉमिक रिफॉर्म्स विथ रेफरन्स टू इलेक्टोराल इश्युज या विषयावर ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले की, निवडणुकांपूर्वी पक्षाच्या जाहीरनाम्यावर अनेक आश्वासने दिली जातात. परंतु सत्तेवर येताच त्यांचा राजकारण्यांना विसर पडतो. ही आश्वासने कागदाच्या तुकड्यापेक्षा महत्त्वपूर्ण ठरत नाहीत. त्यामुळे ही आश्वासने पाळण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर असावी. सत्तेमध्ये आल्यावर आपल्या वचनांची पूर्तता करण्यास असमर्थ ठरलेले पक्ष किरकोळ कारणे देऊन जबाबदारी झटकतात.

COMMENTS