अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन !

अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन !

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून एनडीए बैठकीचे निमंत्रण दिले आहे. अमित शाह यांनी काल (गुरुवारी) रात्री उद्धव ठाकरेंना फोन करुन निमंत्रण दिलं.

 

दिल्लीत 10 एप्रिलला ही बैठक  होणार असून विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच राष्ट्रपती पदाचा एनडीएचा उमेदवार ठरवण्याबाबतही चर्चा अपेक्षित आहे. शिवसेना भाजप मध्ये निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातले भाजपचे दोन ज्येष्ठ मंत्री ‘मातोश्री’वर सदिच्छा भेटीसाठी जाणार होते. मात्र एनडीए बैठकीच्या निमित्तानं जर पक्ष श्रेष्ठी स्तरावरच शिवसेनेशी संबंध मधुर करण्यासाठी प्रयत्न होण्याचे संकेत मिळाल्याने मंत्र्यानी त्यावेळी ‘मातोश्री’ वारी पुढे ढकलली.

 

सध्या शिवसेना खासदार रवी गायकवाड यांनी एअर इंडिया अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीचं प्रकरण खूप गाजतेय. एअर इंडिया आणि अन्य विमान कंपन्यांनी गायकवाड यांना हवाई प्रवासाची सेवा नाकरलीय. त्याचे पडसाद संसदेत उमटत आहेत. जोपर्यंत गायकवाड यांच्यावरचे निर्बंध हटवले जात नाहीत तोपर्यंत शिवसेना एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार नाही असा पावित्रा पक्षानं घेतलाय. त्यामुळे या बैठकीला  उद्धव ठाकरे जाणार की नाहीत,  याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

 

 

COMMENTS