जयपूरमध्ये आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची आमदार आणि खासदारांसोबत बैठक झाली. या बैठकी दरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संवरलाल जाट हे बेशुद्ध पडले. जाट यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले.
याबाबत भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, “बैठक सुरू असताना जाट आपलं मत मांडण्यासाठी उभे राहिले. पण काही क्षणांतच ते खाली कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.” मुख्यमंत्री राजे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य रुग्णालयात पोहोचले असून त्यांनी संवरलाल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
COMMENTS