अमित शहांमुळेच चंद्रकांत पाटील महसूलमंत्री पदावर – शिवसेना

अमित शहांमुळेच चंद्रकांत पाटील महसूलमंत्री पदावर – शिवसेना

मुंबई –  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने सरकारविरोधात आंदोलन करून स्वतःचेच हसे करून घेतले आहे, अशी टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी यावरुनच चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे. चंद्रकांत पाटील आज महसूलमंत्री पदावर अमित शहा यांच्याशी बरे संबंध असल्यामुळेच आहेत. त्याचबरोबर शिवसेनेला रस्त्यावर राज्यकर्ते नालायक ठरल्यामुळेच उतरावे लागले, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने  सामना संपादकीयमधून सरकारवर तोफ डागली.

शिवसेनेचे हसे महागाईविरोधात आंदोलन केल्याने झाले असे जे म्हणतात त्यांची नाळ जनतेपासून तुटली आहे व सत्तेच्या नशेने त्यांचा ‘इक्बाल कासकर’ झाला आहे, अशी टीकाही उद्धव यांनी केली आहे. अच्छे दिन येणार, ते पहा आलेच आहेत, असे सांगून सत्तेत आल्यावरही ते ‘अच्छे दिन’ काही आलेच नसल्यामुळे मोदी सरकारचे घरोघरी हसू झाले आहे असे आम्ही बोललो तर पाटील यांची कळी खुलेल काय? फसवाफसवी करून शिवसेना सत्ता भोगीत नाही. शिवसेनेने सत्तेत राहून आंदोलने वगैरे करू नयेत असे चंद्रकांत पाटलांना वाटत असेल तर त्यांच्या सरकारने गोरगरीबांचे प्रश्न सोडवायला हवेत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे.

 

COMMENTS