एल्फिन्स्टन-परळ रेल्वे दुर्घटनेप्रकरणी न्यायालयीन चौकशी करा – अशोक चव्हाण

एल्फिन्स्टन-परळ रेल्वे दुर्घटनेप्रकरणी न्यायालयीन चौकशी करा – अशोक चव्हाण

मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावला असून 33 जण जखमी झाले आहेत. आज सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.  जखमींना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी.  अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई आणि जखमींच्या उपचाराचा खर्च सरकारने करावा. हि अतिशय दुर्दैवी घटना आहे. असे चव्हाण म्हणाले.

 

एलफिन्स्टन-परळ रेल्वे दुर्घटने बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. आपल्याला या घटनेने धक्का बसला असून, या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या दुर्घटनेची महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून चौकशी केली जाईल तसेच जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करु असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.

परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या आत्म्याला शांती लाभो, जखमी झालेल्या प्रवाशांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो, असे ट्विट मोदी यांनी केले आहे.

 

 

COMMENTS