भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची गुजरातमधून राज्यसभेवरची निवड निश्चित मानली जात आहे. अमित शहा हे सध्या गुजरात विधानसभेचे सदस्य आहेत. असं असताना त्यांना राज्यसभेवर पाठविण्यामागे मोदींचा निश्चितपणे काहीतरी उद्देश असावा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बिझनेस वर्ल्ड या इंग्रजी वृत्तपत्राने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार अमित शहा हे देशाचे नवे संरक्षण मंत्री होऊ शकतात. तर अमित शहा यांची अध्यक्षपदाची धुरा ही ओम माथूर यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशाला सध्या पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही. त्यातच चीनचं मोठं संकट देशासमोर आहे. असं असताना देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नसल्यामुळे मोदींवर टीका होत आहे. अमित शहा हे या पदाला न्याय देऊ शकतात अशी मोदींची भावना आहे. त्यामुळेच त्यांना राज्यसभेवर पाठवलं जात असल्याची चर्चा आहे.
COMMENTS