शरद पवार यांचा आज होणार नागरी सत्कार

शरद पवार यांचा आज होणार नागरी सत्कार

औरंगाबाद- माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीस 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज (शनिवारी) मराठवाड्याच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
शनिवारी दुपारी देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पवारांचा हा सत्कार होईल. राज्याच्या देशाच्या कायदेमंडळात सलग 50 वर्षे कार्य केलेले शरद पवार एकमेव नेते ठरले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘पद्मविभूषण’ हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले. मागील पाच दशकांत शरद पवारांनी अनेक निर्णय घेतले, अनेक प्रकल्प उभे केले आहेत.

या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पाणीपुरवठा स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, कामगार कौशल्य विकासमंत्री संभाजी निलंगेकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे आदी उपस्थित राहणार आहेत.

 

 

COMMENTS