यंदाचा गणेशोत्सव अभिनेता रितेश देशमुखने अमेरिकेत साजरा केला.यावेळी रितेश देशमुख यांनी इको फ्रेंडली गणेशमूर्ती स्वत:च्या हाताने तयार केली. ट्विटरवर रितेशने याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
‘मी सध्या अमेरिकेत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अमेरिकेत पर्यावरणपुरक गणेशाची मूर्ती बनवून साजरा करणार’ असे रितेशने सांगितले. अमेरिकेतील स्थानिक मातीमध्ये मूर्ती बनवली असून ती रंगवण्यासाठी वॉटर कलरचा वापर केला असून मूर्तीच्या सजावटीसाठी फुलांचा वापर केला आहे. आणि ही मूर्ती त्याने घरीच विसर्जित केली.
रितेशने ही मूर्ती शेतकार्यांना समर्पित केली आहे. ‘जेनेलीयानेच मला ही मूर्ती करण्याबद्दल सुचवले व चित्रीकरणही तिनेच केले. त्यामुळे मी तिला धन्यवाद देतो’, असेही रितेश देशमुख म्हणाला आहे.
Celebrating #GaneshChaturthi in America, Made an idol, I humbly dedicate it to our Farmers. #ECO #Planter #Visarjan #SonOfAFarmer #Bappa pic.twitter.com/OnuU1S0D6a
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 27, 2017
COMMENTS