तामिळनाडूमध्ये दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी सुरू केलेले अम्मा कॅन्टिन तुफान गाजले होते. त्याचा खूप मोठा राजकीय फायदा जयललितांना निवडणुकीत झाला होता. आता त्याच धरतीवर कर्नाटकातील काँग्रेस सरकारने इंदिरा कॅन्टिन सुरू केले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज बंगळुरुमध्ये या कॅन्टीनचा शुभारंभ केला.
राज्यात पहिल्या टप्प्यात 101 कॅन्टिन सुरू करण्यात आली आहे. गरीबांना स्वस्तःमध्ये जेवण उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. त्यामध्ये 10 रुपयांमध्ये जेवण तर 5 रुपयांमध्ये नाष्टा मिळणार आहे. कर्नाटक सरकराचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याची घोषणा केली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कॅन्टीन सुरू केल्याची चर्चा आहे. याचा किती फायदा कर्नाटकात काँग्रेसला होतो ते पहावं लागणार आहे.
COMMENTS