अहमदनगर – जामखेड नगर परिषदेत भाजपचे नेते आणि पालकमंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसंच शिवसेना 4, मनसे 1 आणि अपक्ष तीन नगरसेवकांनीही राम शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले आहे. नगर परिषदेत भाजपचे 3 सदस्य आहे. त्यामुळे राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेतील सर्वच्या सर्व 17 नगरसेवक एकत्र आले आहेत. नगरसेवकांच्या या पंक्षांतरणामुळे भाजपच्या अर्चना राळेभात यांची बिनविरोध निवड झाली आहे.
COMMENTS