अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्याच्यावतीने येत्या शनिवारी (29) जुलैला सर्वपक्षीय नागरी सत्कार तसेच माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या अमृत महोत्सवाचे ही आयोजन करण्यात आले आहे.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखानाच्या कार्यस्थळावर सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग यांचा अमृत महोत्सवी नागरी सत्कार व त्यांनी लिहिलेल्या “शेतमळा ते विधानसभा’ या आत्मचरित्राचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी दिली.
या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
COMMENTS