काकिंडा – महापालिका निवडणुकीत आंध्रप्रदेशातील सत्ताधारी तेलगू देसम पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एकूण 48 जागापैंकी तेलगु देशम पक्षानं 32 जागा जिंकत महापालिकेत बाजी मारली आहे. तर प्रतिस्पर्धी वायएसआर काँग्रेसला केवळ 10 जागा मिळाल्या आहेत. तर भाजप आणि इतरांना प्रत्येकी तीन जागा मिळाल्या आहेत. ही महापलिका 2004 साली अस्तित्वात आली होती. तेंव्हा झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाल होतं. 2010 पर्य़ंत तिथं काँग्रेसचा महापौर होता. त्यानंतर काही काराणुळे तिथे प्रशासक नेमण्यात आला होता. 2010 नंतर पहिल्यांदाच काल निवडणूक झाली. या निवडणूक 2010 साली सत्तेत असलेल्या काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही.
COMMENTS