नवनिर्वाचीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा आज शपथविधी झाला. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रीमंडळातील सहकारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली.
यावेळी बोलतना अनेक नेत्यांनी नायडू यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शेतक-याचा मुलगा उपराष्ट्रपती झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसंच आजपर्यंतच्या उपराष्ट्रपतींपेक्षा ते वेगळे कसे आहेत हे सांगितलं. नायडू हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले उपराष्ट्रपती असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
COMMENTS