आजपासून काँग्रेसचे ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ अभियान, बुलडाण्यातून सुरूवात

आजपासून काँग्रेसचे ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ अभियान, बुलडाण्यातून सुरूवात

मुंबई – राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आणि अतिरंजीत आणि खोटे आकडे देऊन सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. सरकारचा खोटेपणा उघड करण्यासाठी आणि सरसकट सर्व शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस पक्ष आजपासून  ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ हे राज्यस्तरीय अभियान राबवणार आहे. बुलडाण्यातून त्याची आज सुरूवात होत आहे.

सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली सरकारने घातलेल्या जाचक अटी व शर्तींमुळे बहुतांशी शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. ज्या शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आणि ज्यांचा सातबारा कोरा झाला नाही अशा सर्व शेतक-यांच्या सह्या घेऊन सरकारला निवेदन देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही काँग्रेस पक्षाची मागणी कायम असून 30 जून 2017 पर्यंत थकीत असलेल्या सर्व शेतक-यांचे कर्ज माफ करावे तसेच कर्जाचे पुनर्गठण झालेल्या सर्व शेतक-यांचे कर्ज माफ होईपर्यंत काँग्रेस पक्षाचा लढा सुरुच राहील असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

COMMENTS