‘या’ पाच जिल्ह्यात 15 जुलैपासून हेल्मेटसक्ती, शिवसेनेचा मात्र विरोध

‘या’ पाच जिल्ह्यात 15 जुलैपासून हेल्मेटसक्ती, शिवसेनेचा मात्र विरोध

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण या जिल्ह्यामध्ये 15 जुलैपासून वाहनचाकाना हेल्मेट सक्ती केली जाणार  आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. 

पोलीस प्रशासनाने वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस प्रशासनाने याची संपूर्ण तयारी केली असली, तरी शहराअंतर्गत हेल्मेट शक्तीला शिवसेनेनं विरोध दर्शवला आहे.

सध्या महामार्गावर विना हेल्मेट दुचाकीस्वार सापडला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. याचा दुसरा टप्पा म्हणून 15 जुलै पासून जिल्ह्यासह शहरातही हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे.

शहराअंतर्गत हेल्मेटसक्ती होत असल्याने शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शहरात वाढणाऱ्या चोऱ्या, हत्या, मारामाऱ्या यासह मटका, दारु या अवैध व्यवसायाकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन हेल्मेट सक्तीच्या मागे लागल्याचं म्हणंत त्याला विरोध दर्शविला आहे. पार्किंग, वाहतूक कोंडी यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.

 

COMMENTS