आणीबाणीवरुन भाजप विरुद्ध काँग्रेस !  

आणीबाणीवरुन भाजप विरुद्ध काँग्रेस !  

आणीबाणीच्या 42 व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने 25 जून रोजी मोदी सरकारचे मंत्री देशातील विविध भागांत जाऊन आणीबाणीबाबत जनजागृती करणार आहेत. या जनजागृती कार्यक्रमा मागे काँग्रेसला लक्ष्य करण्याची रणनीती असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे  आणिबाणीवरुन आता  भाजप विरुद्ध काँग्रेस असा वाद रंगणार आहे.
आपल्याविरोधातील राजकीय उठाव दडपून टाकण्यासाठी 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. या काळात सरकारला विरोध करणाऱ्या सर्व नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले. वृत्तपत्रांवर बंधनं आली. काँग्रेसी कारभाराच्या या आठवणी पुन्हा ताज्या व्हाव्यात म्हणून मोदींचे मंत्री देश पिंजून काढणार आहेत. त्यासाठी मंत्र्यांच्या दौऱ्यांची आखणी सुरू आहे. स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारकांच्या जन्मस्थळांची यासाठी निवड करण्यात येणार आहे. काही मंत्री बाइक रॅली काढून जागृती करणार आहेत.

‘मागच्या वर्षी झालेल्या आणीबाणीविरोधी जागृती कार्यक्रमा पैक्षा यावर्षी असणा-या कार्यक्रम व्याप्ती वाढवण्यात येणार आहे,’ असं भाजपच्या एका नेत्यानं सांगितलं.

COMMENTS