नेवाळीतील जमीन संरक्षण खात्याच्या मालकीची

नेवाळीतील जमीन संरक्षण खात्याच्या मालकीची

कल्याण- नेवाळी विमानतळाच्या जमीन अधिग्रहणावरुन आज शेतक-यांनी आंदोलान केले, यावेळी या आंदोलानाला हिंसक वळण लागलं होत. ‘नेवाळी येथील जमीन संरक्षण खात्याच्या मालकीची आहे. तशी नोंद असून त्या जमिनीचा सातबाराही संरक्षण खात्याच्या मालमत्ता विभागाकडं आहे,’ असं संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संरक्षण खात्यानं संपादित केलेल्या नेवाळी येथील1600 एकर जमिनीवरून सध्या वाद सुरू आहे. नेवाळी येथील शेतकऱ्यांनी जमीन परत मिळवण्यासाठी हिंसक आंदोलन सुरू केलं त्यामुळे या जमिनीची मालकी नेमकी कोणाची, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

या प्रकरणी संरक्षण खात्याच्या जनसंपर्क कार्यालयाने पत्रक प्रसिद्धीस देऊन खुलासा केला आहे. ‘नेवाळीतील जमीन संरक्षण खात्यानं संपादित केली आहे. या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून भारतीय नौदलाकडून या जागेभोवती संरक्षक भिंत बांधण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्र सरकारलाही याची पूर्ण कल्पना असून त्यांनी त्यासाठी पोलीस संरक्षणही दिलं आहे,’ असं संरक्षण खात्याचे मुंबई विभागीय जनसंपर्क अधिकारी कमांडर राहुल सिन्हा यांनी स्पष्ट केलं आहे.

COMMENTS