राज्य सरकारने 10 हजार रुपये उचल देण्याचा निर्णय 10 जून रोजी घेतला, त्याला आज 22 दिवस झाले मात्र 3 जुलै पर्यंत केवळ 1082 शेतकऱ्यांना 10 हजार मिळाले आहे. राज्य सरकारने सातत्याने असत्याचा प्रचार सुरू केला आहे. खोटे आकडे देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
फक्त 4 जिल्हा बॅंका़कडून फक्त पैसे मिळाले या सरकारची कार्यक्षमता किती आहे ते दिसते. 10 हजारची उचल केवळ 1082 शेतकऱ्यांना मिळाली आहे. बॅंकि़ग समितीने दिलेल्या आकडेवारीत मुंबई शहर आणि उपनगरातील थकीत शेतक-या़ची आकडेवारी नाही. मग मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीत मुंबईतील शेतकरी आले कसे. सरकार आता दावा करतंय तोही चुकीचा आहे. इतर राज्यातील शेतकऱ्यांची यादीही चुकीची आहे. पारदर्शक मुख्यमंत्री अपारदर्शक काम कसं करू शकतात, असा संतप्त सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला.
COMMENTS