आता पाकिस्तानात फटाके फुटणार का ?  काँग्रेसचा सवाल

आता पाकिस्तानात फटाके फुटणार का ? काँग्रेसचा सवाल

‘अमित शाह म्हणाले होते, नितीश कुमार निवडून आले तर पाकिस्तानात फटाके फुटतील आता पाकिस्तानात फटाके फुटणार का ?’ असा सणसणीत सवाल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजीव सातव यांनी  केला आहे .

कहाॅ से आया था वो… जाने कहाॅ उसे ढुंढो…. या थ्री इंडियट्स चित्रपटातील गाणं नितीश कुमार यांनी मोदींवर तयार केलं होत.  ‘नितीश कुमार हे 2019 नंतर काॅंग्रेस सोबत येतील. बिहारला निधी देण्यासाठी मोदींनी बोली लगावली होती.  बिहारी जनतेचा अपमान केल्याबद्दल नितीश कुमार यांनी मोदींना विरोध केला होता. आता नितीश कुमार बिहारचा अपमान विसरले आहेत का ?’ असा सवाल सातव यांनी केला.

 

नितीश कुमार खलनायक

‘नितीश कुमारांनी जनतेसोबत दगा केला आहे.  ते गाणं आहे ना, नायक नही खलनायक हूॅ मैं. आता नितीश कुमार ही खलनायकाची भूमिका बजावत आहेत. आता नितीश कुमार राहुल गांधी यांच्यावर आरोप करत आहेत. मात्र राहुलजींनी लालू प्रसाद यादव आणि नितीश यांना एकत्र बसवून युती केली होती’. असे सातव म्हणाले.

 

बिहार राज्यपालांची भूमिका संशयास्पद

बिहार राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे. असे वक्तव्य राजीव सातव यांनी केलयं. बिहारचा मोठा पक्ष आरजेडी आहे.  त्यांना सरकार स्थापनेची संधी द्यायला पाहीजे होती. भाजप सरकार राज्यपालांचा वापर करून घेत आहे. असा आरोप ही त्यांनी केला.

 

COMMENTS