आता पासपोर्टसाठी हिंदी भाषेतून अर्ज करता येणार!

आता पासपोर्टसाठी हिंदी भाषेतून अर्ज करता येणार!

पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला स्वतःचे डॉक्युमेंट्स ऑनलाइन पद्धतीने देता येणार आहेत. तसेच ओळखपत्र आणि रहिवास दाखल्याच्या जागेवर फक्त एका आधार कार्डवर तुम्हाला पासपोर्ट मिळवता येणार आहे. त्याप्रमाणेच इंग्रजी भाषेचे ज्ञान नसलेल्या लोकांसाठी हिंदीतून अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

​परराष्ट्र मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या एका तरतुदीनुसार पासपोर्टसाठी आता हिंदी भाषेतूनही अर्ज करता येणार आहे. संसदीय समितीच्या नवव्या अहवालातील अधिकृत भाषे संबंधातील शिफारशी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला आहे. या समितीने  2011 साली हा अहवाल सरकारला दिला होता. पासपोर्ट कार्यालयात हिंदी आणि इंग्रजी या दोन्हीही भाषांमध्ये अर्ज उपलब्ध असावा, अशी शिफारस समितीकडून करण्यात आली होती.

संसदीय समितीने हिंदीत भरलेले अर्ज स्वीकारले जाऊन पासपोर्टवरील सर्व नोंदी हिंदीत असण्याची अट घातली होती, त्याप्रमाणेच पासपोर्ट आणि व्हिसासंबंधित माहितीही परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर हिंदीत टाकण्यात यावी, असेही समितीने सूचवले होते. तसेच पासपोर्ट कार्यालयात हिंदीतून काम करण्याची परवानगी देण्यासोबतच पासपोर्ट कार्यालय आणि दूतावासात हिंदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची समितीची अट होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदीय समितीच्या या सर्व शिफारशींना मंजुरी दिली असून, तुम्हाला आता हिंदीतील अर्ज डाऊनलोड करता येणार आहेत.तसेच ते हिंदीतून भरून जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे

COMMENTS