तूर खरेदीसाठी मुख्यमंत्री करणार केंद्री कृषीमंत्र्यांशी चर्चा

तूर खरेदीसाठी मुख्यमंत्री करणार केंद्री कृषीमंत्र्यांशी चर्चा

राज्यात वाढलेल्या तूर खरेदीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेणार आहेत. तुरीची निर्यातबंदी उठवण्याबाबतीत या भेटीत चर्चा होईल. तुरीवरची निर्यात बंदी उठवली तर शेतक-यांची तूर खरेदी करण्याच्या मार्ग सोपा होईल, अशी माहिती सहकार आणि पणण मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

नाफेडने 22 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून तूर खरेदी बंद केल्याने शेतकऱयांची मोठी अडचण झाली आहे. तूर खरेदी केंद्राबाहेल शेतकरी तळ ठोकून बसलेले आहेत. मात्र तूर खरेदीची मुदत संपल्याने नाफेडने खरेदी बंदी केली आहे. बारदान्याअभावी आधीपासूनच चर्चेत असलेली तूर खरेदी सरकारे अखेर बंद केली. शेतकऱयांना त्यामुळे मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तूर खरेदी केंद्रांवर विकण्यासाठी आणलेली तूर परत नेण्यासाठीही अनेक शेतकऱयांकडे वाहतूक खर्चही द्यायला पैसे नाहीत.

सरकारने तूर खरेदी बंद केली आहे, त्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एका शेतकऱ्याला (वय 75) तूर खरेदी केंद्रावरच चक्कर आली. तो खाली पडला. जखमी आवस्थेत त्याला रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्याच्याकडे उपचाराला पैसे नाहीत. तर, दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन तूरप्रश्नावर चर्चा करणार असल्याची माहिती सहकार आणि पणण मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. या भेटीनंतर केंद्र सरकारने तुरीवरची निर्यात बंदी उठवली तर शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचा मार्ग सोपा होईल, अशी पूस्तीही देशमुख यांनी जोडली आहे.

 

COMMENTS