आता बीएसएनएलही स्पर्धेत, 333 रुपयात 270 जीबी डेटा

आता बीएसएनएलही स्पर्धेत, 333 रुपयात 270 जीबी डेटा

खाजगी मोबाईल कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सरकारी बीएसएनएलही सज्ज झालं आहे. रिलायन्सच्या जिओबरोबर स्पर्धा करण्यासाठी आता बीएसएनएल मैदानत उतरलं आहे. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन स्कीम ग्राहकांपुढे ठेवल्या आहेत.  त्यांनी तीन स्कीम जाहीर केल्या आहेत. पहिल्या स्कीममध्ये 333 रुपयांमध्ये 270 जीबी डेटा मिळणार आहे. त्याचा स्पीड थ्री जी आहे. या स्कीमची मुदत तीन महिने म्हणजेच 90 दिवसांची आहे. याचा अर्थ दररोज तीन जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. दुसरी ऑफर 349 रुपयांची आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज थ्री जीचा 2 जीबी डेटा मिळणार आहे. आणि डेटा संपल्यानंतर 80 केबीपीएस स्पीड मिळेल. मात्र या स्कीममध्ये अनलिमिटेड मोफत लोकल आणि एसटीटी कॉल करायला मिळणार आहेत. बीएसएनएलचा तिस-या प्लॅनमध्ये ग्राहकाला ३९५ रूपयांत बीएसएनएल टू बीएसएनल नेटवर्कवर बोलण्यासाठी ३००० मिनिटे आणि अन्य नेटवर्कवर बोलण्यासाठी १८०० मिनिटे मिळतील. त्याचबरोबर ३ जी स्पीडने दररोज २ जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची वैधता ७१ दिवस असेल.

COMMENTS