आता शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप !

आता शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप !

मुंबई –  विधानसभेत विरोधक प्रकाश मेहतांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन आक्रमक झाले असतानाच आता शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाईंवरही भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे. सुभाष देसाईंनी एका बिल्डरसाठी इगतपुरीजवळची एमआयडीसीसाठी अधिग्रहीत केलेल्या जमिनीपैकी चारशे एकर जमीन डिनोटीफाय केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. ही जमीन नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या गोंदे दुमालमध्ये असून ही जमीन एमआयडीसाठी अधिसूचित करण्यात आली होती. यातील 400 एकर जमीन सुभाष देसाईंनी डीनोटीफाय केली. जमिनीवरचे नोटीफिकेशन शिवसेनेजवळच्या एका बिल्डरसाठी हटवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 3 ते 4 हजार कोटींचा घोटाळा या प्रकरणात झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

विधिमंडळात भाजप प्रकाश मेहतांवरील आरोपांमुळे बॅकफूटवर आहे. भाजप अडचणीत असल्याने शिवसेनेला गुदगुल्या होत होत्या. पण आता उद्योगमंत्री सुभाष देसाईंवर विरोधकांनी आरोपांचा बॉम्ब गोळा टाकल्यामुळे या आरोपांना शिवसेना कसे उत्तर देते हे पाहावे लागेल.

 

COMMENTS