आता संरपंचही थेट जनतेतून निवडला जाणार, आजच्या कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब ?

आता संरपंचही थेट जनतेतून निवडला जाणार, आजच्या कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब ?

मुंबई – महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत केलेले बदल भाजपला फायदेशीर ठरल्यामुळे आता ग्रामपंचायतीमध्येही तसेच बदल केले जाण्याची शक्यता आहे. सरपंच हा थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. सध्या ग्रामपंचायतचे सदस्य त्यांच्यामधून सरपंचाची निवड करतात. मात्र नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला. त्याप्रमाणे नगराध्यक्षांची निवड झाली. त्यामध्ये नगराध्यक्षाला 25 टक्के आर्थिक अधिकार देण्यात आले. त्याचा फायदा भाजपला झाला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अनेक ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष निवडूण आला. तसाच प्रयोग आता ग्रामपंचायतीमध्ये होण्याची शक्यता आहे. हा निर्णय आता भाजपला किती फायदेशीर ठरतो ते पहावं लागेल.

COMMENTS