कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी मजा मारतंय कोण? – उद्धव ठाकरे

कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी मजा मारतंय कोण? – उद्धव ठाकरे

कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी मजा मारतंय कोण?,  असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उपस्थित करत भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

”कर्जमुक्तीसाठी लढा दिला कोणी आणि श्रेय घेण्यासाठी पानभर जाहिराती देऊन मजा मारतेय कोण ! अर्थात श्रेय काढून घेणे आणि श्रेय लाटणे हा सध्याच्या राजकीय विचारसरणीचाच एक भाग झाला आहे, पण ‘पब्लिक सब कुछ जानती है’ या विश्वासावरच सध्या जग चालले आहे.”, असा टोलादेखील उद्धव यांनी लगावला आहे.

राजकारण हे सुविधा आणि नफा-तोटा बघूनच केले जाते. वोट बँकांची पर्वा न करता निर्णय घेणारी फक्त शिवसेनाच! आहे. ज्याच्या हाती ससा तो पारधी हे आजच्या राजकारणातही सुरूच आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणांचा पाऊस नेहमीच पडत असतो. निवडणुकांचे घोडा मैदान जवळ आले की, सरकार झोपेतून जागे होते व जनकल्याणकारी, पोटापाण्याच्या प्रश्नांवर एका ‘झटक्यात’ निर्णय घेतले जातात. मग विरोधक त्या निर्णयावर टीका करू लागतात. ‘गरिबी हटाव’ असो नाहीतर ‘अच्छे दिन’, या घोषणांचा कुठला आणि कसा लाभ झाला हा संशोधनाचा विषय असला तरी चांगल्याला चांगले म्हणून स्वीकारण्याची दानत आता राजकारणात उरलेली नाही. राजकारण हे साधुसंतांचे राहिले नसल्याने अशा योजनांची चर्चा आणि राजकारण तर होणारच. अशी टीका सामना मधून करण्यात आली आहे.

COMMENTS