युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे शिवसेनेतील राजकीय वजन दिवसागणिक वाढतेय…. निमित्त ठरलंय त्यांचा जन्मदिवस…. आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी ‘मातोश्री’वर शुभेच्छुकांची अक्षरश: रीघ लागली होती. त्यात युवा सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांपासून ते पक्षाचे नेते, मंत्री, खासदार आमदारांचाही समावेश होता. त्यामुळे आदित्य ठाकरे हे पक्षात समांतर सत्ताकेंद्र तयार होत असल्याची कुजबुज सुरु झालीय.
आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी साज-या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या कानाकोपऱयातून ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसैनिक आणि युवा सैनिक शुभेच्छा देण्यासाठी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनीही व्यक्तिश: या शुभेछांचा स्वीकार केला. पुष्पगुच्छ, केक, मिठाई यांचा ‘मातोश्री’वर खच पडला होता. लवकरच मुंबई विद्यापीठ अधिसभेची निवडणूक होणार. अधिसभेवर आपली वर्णी लागावी यासाठी युवा सेनेतील पदाधिकाऱयांनी आतापासूनच लॉबिंग सुरु केलंय. अधिसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह आदित्य ठाकरे यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करण्याची यावेळी नामी संधी साधली.
COMMENTS