‘आप’चे नेते गुरप्रीत सिंग घुग्गी यांचा राजीनामा

‘आप’चे नेते गुरप्रीत सिंग घुग्गी यांचा राजीनामा

पंजाबमधील आम आदमी पक्षाचे नेते गुरप्रीत सिंग घुग्गी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गुरप्रीत सिंग घुग्गी आम आदमी पक्षाचे पंजाबचे माजी संयोजक होते. आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी झालेली पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. पंजाबमध्ये प्रथमच आम आदमी पक्षाने निवडणूक लढवली होती.

गुरप्रीत सिंग घुग्गी यांच्याआधी सुच्चा सिंग छोटेपूर पंजाब आम आदमी पक्षाचे संयोजक होते. छोटेपूर यांच्यावर तिकीटे विकल्याचा आरोप होता. त्यामुळे त्यांची संयोजक पदावरुन गच्छंती करण्यात आली. गुरप्रीत सिंग घुग्गी यांना हटवल्यानंतर काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाने खासदार भगवंत मान यांच्याकडे पंजाबच्या संयोजक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यामुळे घुग्गी नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. घुग्गी यांनी राजीनामा देण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. पक्ष प्रतिकूल परिस्थितीत कायम पक्षाला साथ दिली, असे घुग्गी यांनी म्हटले. यावेळी बोलताना घुग्गी यांनी केजरीवालांवरदेखील निशाणा साधला. निवडणुकीनंतर केजरीवाल पंजाबमध्ये का फिरकले नाहीत, असा सवाल घुग्गी यांनी उपस्थित केला.

COMMENTS