नवी दिल्ली – ‘पर्यटकांनी भारतात येण्यापूर्वी आपल्या देशात बीफ खाऊन यावे.’ असे वक्तव्य केंद्रीय पर्यटन मंत्री के.जे. अल्फोंस यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स द्वारे आयोजित एका कार्यक्रमात आलेल्या अल्फोंस यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केले.
रविवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात के.जे. अल्फोंस यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अल्फोंज भुवनेश्वर येथे आयोजित इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सच्या ३३ व्या संमेलनात भाग घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, देशातील अनेक राज्यात गोमांस विक्रीवर बंदी आहे. या गोष्टीचा देशाच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होणार नाही का? यावर उत्तर देताना भाजप नेत्याने म्हटले, की विदेशी पर्यटक त्यांच्या देशात गोमांस खाऊ शकतात व भारतात येण्यापूर्वी त्यांनी गोमांस खाऊन यावे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून बीफबाबत हे त्यांचे दुसरे वक्तव्य आहे. नुकतेच त्यांनी म्हटले होते, की केरळचे लोक बीफ खाऊ शकतात. जेव्हा पत्रकारांनी त्यांना त्यांच्या मागील वक्तव्याविषयी विचारले तेव्हा अल्फोंज म्हणाले, की हा प्रश्न फालतू आहे. मी खाद्य मंत्री नाही जो हा निर्णय घेऊ शकेल.
COMMENTS