औरंगाबाद – बातमीचं शिर्षक वाचून तुम्हाला धक्का बसला असेल ना ? पण हे खरं आहे. आगामी गणेशोत्सव आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता कमिटीची बैठक पोलीसांनी बोलावली होती. या बैठकीत काही आमदार आणि खासदारांनी ही मते मांडली आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली.
गणपती मंडळामध्ये कार्यकर्त्यांना रात्री जागरण करावे लागते. त्यामुळे त्यांना पत्ते खेळू द्या असं एका आमदारानं पोलिसांकडे मागणी केली. तर दुसरा लोकप्रतिनिधी म्हणाला नोटबंदीमुळे पैशांची चणचण आहे. त्यामुळे जुगाराचा पैसा मंडळांना चांगल्या कामासाठी वापरु द्या. या आणि अशा एक से बडकर एक आणि त्याही आमदार खासदारांच्या मागण्या आणि सल्ले यामुळे पोलिसही भांडावून गेले.
खरंतर या लोकप्रतिनिधींनी पोलिसांकडे या मागण्या मांडण्यापेक्षा याबाबत कायदा करण्यासाठीच आग्रह धरला पाहिजे म्हणजे मग जुगार कायदेशीर होईल. असे लोकप्रतिनिधी असतील आणि ते अशा मागण्या करत असतील तर सर्वसामान्यांनी पाहयचे कुणाकडे असा प्रश्न उपस्थित होतोय.
COMMENTS