शिवसेनेकडून जैन मुनींच्या पुतळ्याचे दहन

शिवसेनेकडून जैन मुनींच्या पुतळ्याचे दहन

कोल्हापूर – शिवसेनेच्या विरोधात मेळावे घेऊन माथी भडकावण्याचे काम करणाऱ्या जैन मुनींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मुनींच्या विरोधात गुरुवारी छत्रपती शिवाजी चौकात कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना औषधाला सुध्दा कोल्हापुरात ठेवणार नाही असा ईशारा आज शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिला.  अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही प्रत्येक समाजाला वेळोवेळी संरक्षण आणि न्याय देण्याचे काम शिवसेनेने अनेक वर्ष केले आहे आणि अजूनही करत आहे. पण जैन समाजातील मुनींनी उगवत्या सूर्याला नमस्कार करत शिवसेनेच्या विरोधात मेळावे घेऊन समाज बांधवांची माथी भडकविण्याचे काम सुरु केले. हे काम या मुनींनी त्वरित थांबवावे. असे आंदोलक काय म्हणाले

COMMENTS