जम्मू-काश्मीर राज्याच्या स्वतंत्र ध्वजाला कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे आता कर्नाटकातही स्वतंत्र ध्वजाच्या मागणीला जोर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने 9 सदस्यांची ध्वज समिती स्थापन केली आहे. या नव्या ध्वजाला कायदेशीर मान्यता मिळवण्याचं काम या समितीकडे देण्यात आले आहे.
2002 साली कर्नाटक राज्यात पहिल्यांदा स्वतंत्र ध्वजाची मागणी करण्यात आली. मात्र, देशाच्या अखंडतेला धक्का लागत असल्याचे सांगत तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने ही मागणी फेटाळली. पण आता कर्नाटक सरकारने स्वतंत्र ध्वजाची मागणी पुढे केली असून, यासाठी स्वतंत्र ध्वज समितीची स्थापना केली आहे.
COMMENTS