प्रत्येक आपत्तीला महापालिका जबाबदार कशी ? –  उद्धव ठाकरे

प्रत्येक आपत्तीला महापालिका जबाबदार कशी ? – उद्धव ठाकरे

मुंबईत सध्या जोरदार पाऊस होत आहे, या मुसळधार पावसात मुंबई तुंबणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना दिले. तसेच प्रत्येक आपत्तीत महापालिका जबाबदार कशी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुंबईतील नाटय़गृहाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उद्धव बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या मुंबईत मुसळधार पाऊस बरसत आहे. कालही मुंबईत धुंवाधार पाऊस पडला. मात्र, कोठेही पाणी तुंबले नाही. यंदाच्या पावसात मुंबई तुंबणार नाही, प्रत्येक आपत्तीत महापालिका जबाबदार कशी, मुसळधार पाऊस पडत असेल तर महापालिका काय करणार, मुंबई मनपाकडे बोटं दाखवली जातात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

COMMENTS