‘आम्ही बदला घेणार नाही पण गुजरात बदलू’, राहुल गांधींचा मोदींना टोला

‘आम्ही बदला घेणार नाही पण गुजरात बदलू’, राहुल गांधींचा मोदींना टोला

बनासकाठा – काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजरात दौ-यावर आहेत. यावेळी गुजरातमधील बनासकांठा येथे राहुल गांधी म्हणाले की, आम्ही बदला घेणार नाही पण गुजरात बदलू , असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदींना लागावला.  

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या जीएसटी आणि नोटा बंदीला विरोध दर्शवत म्हणाले की, गुजरातमध्ये खरोखरच विकास वेडा झाला आहे. नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर टीका करा पण त्याचवेळी पंतप्रधानपदाचाही मान राखायला हवा, अशी सूचनाही राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडिया टीमला दिली.

याशिवाय, बनसकांठा येथे राहुल गांधी म्हणाले की, गुजरातमध्ये राजकारणात बदला नाही, तर बदलण्याची गजर आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटवर स्पष्टीकरण देत म्हणाले की, माझ्या सल्ल्यानुसार, तीन ते चार लोकांच्या टीमचे ट्वीट करते मात्र राजकीय विषयावरील सर्व ट्वीट माझे असतात.

राहुल गांधी गुजरातच्या सहा जिल्ह्यात प्रचार करणार असून या काळात अनेक ठिकाणी जाहीर सभा आयोजित करणार आहे. यापूर्वी, राहुल यांनी सौराष्ट्र, मध्य गुजरात आणि दक्षिण गुजरातचा निवडणूक दौरा केला आहे. याआधी राहुल गांधी यांनी, बनासकाठा प्रसिद्ध अंबाजी मंदिरात गेला. तेथे त्य़ांनी आरती ही केली.

COMMENTS