पराभवाचे अजब समर्थन; शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढली – आदेश बांदेकर

पराभवाचे अजब समर्थन; शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढली – आदेश बांदेकर

पनवेल महापालिकेत भाजपने मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळाल आहे. एकूण 78 पैकी 48 जागांवर भाजपने आघाडी मिळवत बहुमताचा 40 चा आकडा पार केला आहे. शिवसेनेला मात्र खातं देखील खोलता आलेलं नाही.

शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आदेश बांदेकर यांनी म्हणाले की,’ ही आमची सुरवात असून, शिवसेनेची या निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढली आहे’. असं म्हणत पराभवाचे अजब समर्थन त्यांनी केले आहे.

‘आम्ही युती करून लढलो नाही याचं दुःख आम्हाला नाही. आधी आम्ही पनवेलमध्ये काहीच नव्हतो आता आमची सुरवात झाली आहे. जय पराजय हा तर भाग निवडणुकीचा भाग आहे. या निवडणुकीमुळे शिवसेना पनवेल मधील घरा- घरात पोहचली आहे, असं मत   आदेश बांदेकर यांनी व्यक्त केलंं.

COMMENTS