आम आदमी पार्टीचा काँग्रेसला पाठिंबा – सूत्र

आम आदमी पार्टीचा काँग्रेसला पाठिंबा – सूत्र

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने विरोधी पक्षांच्या उमेदवार मीराकुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खरंतर विरोधकांच्या बैठकीला अरविंद केजरीवाल यांना बोलावण्यात आलं नव्हतं. त्यामुळे आम आद पार्टी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आम आदमी पार्टीने मीरा कुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे.

विरोधकांचं ऐक्य दाखवण्यासाठी केवळ हा निर्णय घेतला जात असल्याचं आम आदमी पक्षातले नेते खाजगीत सांगत आहेत. पुढे वेळ आलीच तर आम आदमी पार्टी भाजपऐवजी काँग्रेसला जवळ करेल असेच संकेत यामधून देण्यात येत असल्याचं राजकीय अभ्यासकांना वाटतंय.

 

COMMENTS