जीएसटीचा जल्लोष करणा-या भाजपला शिवसेनेचा टोला !

जीएसटीचा जल्लोष करणा-या भाजपला शिवसेनेचा टोला !

‘जीएसटी’ चा जल्लोष साजरा करणा-यांनो, जकात नाके बंद पडल्यामुळे भगदाडांकडे लक्ष देऊन मुंबईची काळजी घ्या असा, जल्लोष सुरु असताना मुंबईत एखादा कसाब राजरोस घुसू नये यासाठी सावध राहा, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी  भाजपला लागावला आहे.

आज पासून जीएसटी लागू झाल्याबद्दल भाजप जल्लोष साजरा करीत आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर वाशी, ऐरोली, पनवेल, मुलुंड आणि दहिसर या प्रमुख नाक्यांसह सर्वच जाकात नाके बंद झाले असून सुरक्षा यंत्रणा तिथून हटल्याने मुंबईला भगदाड पडल्याची चिंता शिवसेनेने व्यक्त केली आहे.

संसदेत शिवसेनेच्या पाठिंब्याने जीएसटी विधेयक मंजूर झाला आहे. मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडू नये यासाठी शिवसेनेनं आवश्यक त्या सुधारणा या विधेयकात करून घेतल्या. असं मत संजय राऊत यांनी एका प्रसिद्धी निवेदनाद्वारे व्यक्त केलीय.

COMMENTS