“आरक्षणबाबत ठोस निर्णय घ्या, अन्य़था राजकीय ताकद दाखवून देऊ”

“आरक्षणबाबत ठोस निर्णय घ्या, अन्य़था राजकीय ताकद दाखवून देऊ”

मुंबई – मुंबईत येत्या 9 तारखेला होणा-या मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात मराठा क्रांती मूक मोर्चाच्या मुंबईतील पदाधिकाऱयांची बैठक पार पडली. यावेळी मोर्चा दरम्यान सरकारशी कुठलीही चर्चा केली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला. तसेच याआधी काढण्यात आलेल्या 58 मोर्चांमध्ये व्यक्त झालेल्या मागण्या सरकारला ठाऊक आहेत. त्यामुळे आरक्षणाबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा मराठा समाज सरकारला राजकीय ताकद दाखवू देईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

             मुंबईतील मराठा मोर्चाला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता त्यादिवशी गैरसोय होऊ नये म्हणून चाकरमान्यांनी शक्यतो सुट्टी घ्यावी आणि आंदोलनाला सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केलंय. भायखळा जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा 9 ऑगस्टला काढण्यात येणार आहे. तसेच हा मोर्चा गर्दीचे विश्वविक्रम तोडेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केली आहे. 

COMMENTS