राज्यसभेतही आता भाजप नंबर 1

राज्यसभेतही आता भाजप नंबर 1

लोकसभेत घवघवीत यश मिळवेल्या भाजपला राज्यसभेत मात्र आजपर्य़ंत बहुमत नव्हतं. त्यामुळे अनेक महत्वाच्या विधेयकांवर भाजपची  कोंडी व्हायची. आता मात्र राज्यसभेतही भाजपने काँग्रेसला मागे टाकले आहे. त्यामुळे राज्यसभेतही भाजपकडे बहुमत झाले आहे. आता राज्यसभेत भाजपचे 58 खासदार झाले आहेत. तर काँग्रसचे 57 खासदार झाले आहेत.

खरंतर राज्यसभेत 2018 पर्यंत काँग्रेसचं बहुमत राहणार होतं. मात्र दोन सदस्यांच्या निधनामुळे त्यांची संख्या घटली आणि पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला. त्यामुळे काँग्रेसला राज्यसभेतली नंबर 1 ची जागा गमवावी लागली आहे. त्यातच आता जेडीयू एनडीच्या गोटात सामिल झाल्यामुळे त्यांचं बळ आणखी वाढलं आहे. तामिळनाडूमधील अण्णा द्रमुकही भाजपच्या गोटात सामिल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS