आरोपी आमदाराला बीड पोलिसांकडूनच शाही पाहुणचार !

आरोपी आमदाराला बीड पोलिसांकडूनच शाही पाहुणचार !

बीड – राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार आणि अण्णाभाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांना बीड न्यायालयाने दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे कदम यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवणे गरजेचे असताना त्यांना झोपण्यासाठी आणि सकाळी अंघोळीसाठी चक्क शासकीय विश्रामगृहावर ठेवण्यात आले. एका आरोपीला पोलिसांनीच अशी शाही वागणूक का दिली असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

COMMENTS