आणखी एक सुपरस्टार राजकारणाच्या आखाड्यात ?

आणखी एक सुपरस्टार राजकारणाच्या आखाड्यात ?

सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा सुरु असतानाच आता अभिनेते कमल हसन यांच्या राजकारणातील एन्ट्रीची जोरदार चर्चा  सुरु आहे.  कमल हसन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक तमीळ कविता पोस्ट केले आहे. कमल हसन यांनी कवितेतून राजकारणातील ‘एण्ट्री’चे संकेत दिले आहेत. कवितेतून त्यांनी सरकारवरही टीका केलीय.

तामिळ भाषेतच कमल हसन यांनी ट्विट केलंय. ‘थोट्टरींथल पोराली, मुदीवेदुथाल याम मुथलवार’, असं म्हणत ‘मी भ्रष्टाचाराविरोधात लढा देतच राहीन,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. जनता कुणाचीही गुलाम नाही. चुकीच्या मार्गानं जात असलेल्या सरकारविरोधात लढा देण्यासाठी मला साथ द्या, असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे. काही दिवसांपूर्वीच सुपरस्टार रजनीकांतही राजकारणात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात होतं. जनतेमध्ये या कलाकारांप्रती असलेली आपलेपणाची भावना आणि या कलाकारांचं समाजकार्य पाहता त्यांची राजकीय इनिंग फारच रंजक असेल यात शंकाच नाही.

 

COMMENTS