मीरा भाईंदर – 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी जे विधान केलं होतं. त्यावरुन आर आर पाटील यांना घरी जावं लागलं होतं. त्यांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी आर आर पाटील यांच्या विधानावरुन आकांड तांडव करणारे राज्याचे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशातील आरोग्यमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष यांच्या विधानवर एक ब्र शब्द सुद्धा काढ नाहीत अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
गोरखपूरमध्ये एका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यामुळे तब्बल 70 मुलांचा जीव गेला आहे. त्यावर उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री यांनी अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केलं होतं. पटकीमुळे ऑगस्टमध्ये यूपीत मुले मरतातच असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही यापुर्वी अशा दुर्घटना अनेकवेळा झाल्या आहेत. त्यामुळे हे काही फार वेगळं नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर देशभरातून टीकेची झोड उटली होती. मात्र ज्या प्रमाणे आर आर पाटील यांनी राजीनामा दिला. तशी नैतिकता यांनी दाखवली नाही असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मीरा भाईंदर निवडणुकीच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजपवाल्यांना आमदार फोडायला, मतदारांना पैसे वाटायला पैसे आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात चिमुकली तडफडून मेली मात्र यांच्याकडे ऑक्सिजन घ्यायला पैसे नाहीत असा टोलाही ठाकरे यांनी हाणला.
COMMENTS