राज ठाकरेंचा आजपासून दोन दिवसांचा पुणे दौरा

राज ठाकरेंचा आजपासून दोन दिवसांचा पुणे दौरा

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौ-यावर आले आहेत. या दौ-यात ते शहरातील पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि नवीन पदाधिकारी नेमणुकांच्यासाठी मनसैनिकांना भेटणार आहेत. यावेळी मनसे नेते राजन शिरोडकर व सरचिटणीस संदीप देशपांडे तसेच उपाध्यक्ष प्रमोद पाटील हे देखील राज ठाकरे यांच्यासोबत असतील. या बैठका विभाग निहाय होणार असून १८ व १९ या २ दिवसासाठी संबंधितांना वेळ विभागून देण्यात आली आहे. या बैठका शिवाजीनगर भागात होणार असून सकाळी १० ते रात्री ८ या वेळात या बैठका होणार आहेत. पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी ही माहिती दिली.

2012 च्या महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी मनसेला भरभरुन मतदान दिलं होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत इतर ठिकाणांप्रमाणे पुण्यातही पक्षाची पुरती पिछेहाट झाली  आहे. 2012 साली 28 जागा जिंकणा-या मनसेला यावेळी केवळ 2 जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे पक्षात मरगळ आली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत बांधणी आणि मनसैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा दौरा कितपत फलदायी ठरतो हे पाहण्यासाठी काही काळ वाट पहावी लागेल.

COMMENTS